सांगली: मरगुबाई मंदिर भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू… मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
सांगली/
सांगली जिल्ह्यातील मोटेवाडी गावातील मरगुबाई देवस्थान मंदिराशेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांपैकी तिघे हे जत तालुक्यातील असून तिघे हे कर्नाटकातील आहेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेत 13 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज, जत, संख आणि विजापूर येथील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”


