पोलीओ डोस दिल्यानंतर अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू
जळगाव/
पोलिओ डोसनंतर अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा अचानक मृत्यू झाला. आजोबांनी नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून शवविच्छेदन खोलीच्या बाहेर बसून रात्र काढली. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अमानवीय प्रकाराने संतापाची लाट उसळली आहे. चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी प्रचा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत सचिता दीपक बोरसे या अडीच महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. “किमान शव पेटीत तरी मृतदेह ठेवायला हवा होता” म्हणत नातेवाईकांचा संताप; चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे.


