वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव कुबल यांचे निधन
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
वेंगुर्ला नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष, आंबा बागायतदार आणि माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे अत्यंत जवळचे सहकारी शिवाजीराव कुबल यांचे गुरूवार दिनांक २३ जुलै रोजी रात्री दु:खद निधन झाले. त्यांचे कृषी व फलोउत्पादन क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषी पंडित या पुरस्काराने सन्मानित केले होते.
त्यांच्या निधनाबद्दल माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दु:ख व्यक्त केले आहे. शिवाजीराव कुबल हे माझे जवळचे सहकारी होते. कुबल यांचे निधन झाल्याचे समजून अत्यन्त दुःख झाले आहे. सर्व कुबल कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाचे वेळी मी माझ्या मुलीकडे अमेरिकेत असल्यामुळे अंत्यसंस्कारात सहभागी होता येत नाही. शिवाजीरावांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही श्री देव पाटेकर चरणी प्रार्थना, अशी शब्दांत श्री. भोसले यांनी श्रद्धांजली वाहीली आहे.


