न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जळून नष्ट होणारा चारा वैरण म्हणून राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांना देण्याचं नियोजन करा : नितेश राणे

 

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर

 

राज्यातील दुष्काळ परिस्थिती आणि शेतीवर झालेला परिणाम लक्षात घेता पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनावरांसाठी ३,८०,००० मेट्रिक टन वैरण उपलब्ध आहे. तो पुरेसा असेल तर एरवी जळून नष्ट होणारा माळ रानातील चारा कापून तो राज्यातील दुष्काळी जिल्ह्यासाठी देण्यासाठी तातडीने उपाय योजना करा असे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्गनगरी येथील बैठकीत दिले.

दुष्काळाची परिस्थिती व त्यानुसार नियोजन, जिल्ह्यातील पशुधन व या जनावरांची वैरण व्यवस्था याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपाध्यक्ष दादा साईल, पशुसंवर्धन अधिकारी समीर बिलोलीकर उपस्थित होते.

पावसाच्या अनियमिततेमुळे ग्रामीण भागातील शेती आणि पशुपालनासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा, तसेच संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. तसेच हिरव्या चारासाठी मका बियाणे उपलब्ध करून दिले तर त्यासाठी लागणारे पाणी हा ही अडचणीचा विषय ठरेल त्यामुळे त्याचेही नियोजन करून निर्णय घ्यावा असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे