न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला नवीन फ्रीजर द्या, देव्या सुर्याजी यांची मागणी

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात तीन वर्षांपूर्वी नव्याने बसविण्यात आलेला फ्रिजर कुलिंग देत नसल्याने बंद पडत आहे. त्यामुळे आपत्काळात मृतदेह ठेवायचा कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला असून याची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी श्री.देव्या सुर्याजी यांनी केली आहे‌.
उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहातील बंद फ्रिजर युवा रक्तदाता संघटनेच्या पाठपुराव्यानंतर दुरुस्ती करण्यात आला होता. परंतु, तीन वर्षात शवागृहातील हा फ्रिजर कुलिंग देत नसल्याने तो कुचकामी ठरत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री मृतदेह ठेवायचा कुठे,असा प्रश्न निर्माण झाला असून रुग्णांच्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.कालच घडलेला प्रसंग दुपारी १ वाजता शव फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते पण रात्री १२ वाजता कुलिंग बंद पडल्याने आयत्यावेळी रुग्णालय प्रशासन कडून शव हलविण्यास सांगण्यात आले. आयत्यावेळी च्या प्रसंगामुळे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.पार्श्वभूमीवर तात्काळ नवीन फ्रीजर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दयावा अशी मागणी श्री. सुर्याजी यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे‌.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे