कुडाळात वीजेचा शॉक लागून चिपळूण मधील युवकाचा मृत्यू
सिंधुदुर्ग / राजू तावडे
कुडाळ येथील केळबाईवाडी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या कॉम्प्लेक्समध्ये अंतर्गत विद्युत जोडणीचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का बसून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
मृत तरुणाचे नाव शुभम गणपत कोकरे (वय १९, मूळ रा. खेडी दत्तवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, सध्या रा. कुडाळ) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आपल्या कुटुंबीयांसह संबंधित कॉम्प्लेक्समध्ये लाईट फिटिंगचे काम करत होता. ब्रेकरच्या सहाय्याने काम सुरू असताना ब्रेकरची वायर शॉर्ट असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. त्याचवेळी विद्युत प्रवाह सुरू असल्याने शुभमला विजेचा भीषण धक्का बसला. त्यामुळे तो जागीच बेशुद्ध होऊन खाली कोसळला.


