पश्चिम महाराष्ट्रासह पुर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे / वृत्तसंस्था
कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. आज पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर त्याचप्रमाणे विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.”

सोमवारी सकाळपर्यंतच्या मागील २४ तासांत सोलापूरमध्ये राज्यातील सर्वाधिक ३४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. त्याचवेळी महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी १७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतलीये. मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतायत. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमध्ये सर्वाधिक ८७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झालीये.”