न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

12तासात दोन भावांचे निधन.. जेष्ठ पत्रकार उत्तम वाडकर यांच्यासह त्यांच्या बंधूंचे निधन

सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तसेच *’साप्ताहिक संघटन’*चे राष्ट्रीय नेते उत्तम उर्फ भास्कर सूर्यकांत वाडकर (वय ७२, रा. खासकीलवाडा, सावंतवाडी) यांचे रविवारी सायंकाळी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असतानाच, वाडकर कुटुंबावर नियतीने आणखी एक मोठा आघात केला.

उत्तम वाडकर यांच्या निधनाच्या अवघ्या १२ तासांपूर्वी त्यांचे धाकटे बंधू उदय सूर्यकांत वाडकर (वय ६२) यांचे शनिवारी निधन झाले होते. विशेष म्हणजे, रविवारी सकाळी उदय वाडकर यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर काही तासांतच कोल्हापूर येथे उपचार घेत असलेल्या उत्तम वाडकर यांच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे अवघ्या एका दिवसात दोन सख्ख्या भावांच्या निधनाने वाडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

उत्तम वाडकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात अनेक वर्षे उल्लेखनीय कार्य केले. *’साप्ताहिक संघटन’*चे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. तसेच शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख म्हणूनही त्यांनी राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेतील योगदानामुळे त्यांना जिल्हाभरात मानाचे स्थान होते.

धाकटे बंधू उदय वाडकर हे अनेक वर्षे प्रोफेशनल कुरिअर सेवेशी संबंधित होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीय सावरत नाहीत तोच मोठे बंधू उत्तम वाडकर यांच्या निधनाची दुःखद वार्ता आल्याने सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

या दुहेरी दुःखद घटनेमुळे राजकीय, सामाजिक, पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाडकर कुटुंबीयांचे सांत्वन करत दोन्ही बंधूंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे