न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जिल्हास्तरीय ‘कोमसाप गीत रचना’ स्पर्धेत आनंद वैद्य प्रथम

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

    कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय साहित्य संमेलन नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरी येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेचे अधिकृत ‘कोमसाप गीत’ निश्चित करण्यासाठी तालुका ते केंद्रीय स्तरावर गीत रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रेरणेने ही स्पर्धा घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ आणि मालवण या तालुका शाखांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. गेल्या आठवड्यात तालुकास्तरीय स्पर्धा झाल्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण ९ स्पर्धक सहभागी झाले होते. सावंतवाडीहून ॲड. नकुल पार्सेकर, दीपक पटेकर, गजेंद्र कोठावळे, कुडाळ येथून आनंद वैद्य, राज भिंगारे, संदीप साळसकर आणि मालवणमहून रुजारिओ पिंटो, मंदा सांबारी, ऋतुजा केळकर यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक कवी-लेखक आनंद वैद्य (कुडाळ) यांच्या गीतरचनेला, द्वितीय क्रमांक मालवणी कवी रुजारिओ पिंटो (मालवण) यांना, तर तृतीय क्रमांक ॲड. नकुल पार्सेकर (सावंतवाडी) यांना मिळाला. या तिन्ही निवडक गीत रचना आता प्रांतिक कार्यालयाकडे केंद्रीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहेत.

सर्व स्पर्धकांचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सचिव ॲड. संतोष सावंत आणि जिल्हा कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे.दरम्यान, दि. २७ ते २९ नोव्हेंबरमध्ये रत्नागिरी येथे होणाऱ्या केंद्रीय साहित्य संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कोमसाप सदस्यांनी आपली नावे ३० सप्टेंबरपूर्वी आपल्या तालुका शाखेकडे किंवा जिल्हा सचिव संतोष सावंत (मो. ९४२३०५१५३०) यांच्याकडे पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे