पर्यटनदृष्ट्या सावंतवाडीला विकसित करण्यासाठी रोपवे उभारण्याची वरिष्ठांकडे मागणी करणार… मोहिनी मडगावकर
सिंधुदुर्ग|राजू तावडे
सावंतवाडी शहरातून बाहेर गेलेला महामार्ग तसेच रेल्वे टर्मिनस यांच्या मुळे शहरातील पर्यटकांचा ओघ कमी झाला आहे तो वाढवण्यासाठी आणि शहराचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढावे या दृष्टीने होती तलाव ते नरेंद्र डोंगर माथा रोपवे करण्याची मागणी आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचे आश्वासन उद्यान सभापती मोहीनी मडगावकर यांनी दिले आहे.
होती तलावाकाठी नियोजित फुडकोर्ट ची जागेची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी हे आश्वासन दिले.यावेळी दुलारी रांगणेकर,दीपाली भालेकर, सुनीता पेडणेकर , सुकन्या टोपलेआदी उपस्थित होते.


