न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

या भूमीशी आमचे आध्यात्मिक नाते, कवयित्री कालिका बापट ….. ​सावंतवाडीत १९ वे विभागीय कवयित्री संमेलन संपन्न

 

​सिंधुदुर्ग / राजू तावडे

“सावंतवाडीशी माझे वेगळे नाते आहे. संत मियांसाब हे माझ्या वडिलांचे गुरू होते, त्यामुळे या भूमीशी आमचे आध्यात्मिक नाते जोडले गेले आहे. असे उद्गार संमेलनाच्या उद्घाटक प्रसिद्ध कवयित्री कालिका बापट यांनी काढले. वडिलांनी पुढे गोव्यात मियांसाबांचा मठ उभारून हे कार्य सुरू ठेवले.” गोव्यातील भाषिक स्थितीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, “गोव्याची मूळ भाषा मराठीच आहे. कोकणी बोलली जात असली तरी मोठ्या प्रमाणात लिखाण मराठीतूनच होते. महाराष्ट्र, सिंधुदुर्ग आणि गोवा यांच्यातील हा साहित्यसेतू अधिक बळकट व्हायला हवा.” असे बापट म्हणाल्या.
चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी संस्था आयोजित, ‘आरती’ मासिक, कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आणि श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वे विभागीय कवयित्री संमेलन आज शनिवारी सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी कवयित्री कालिका बापट बोलत होत्या. या संमेलनाचे उद्घाटन कवयित्री कालिका बापट यांच्या हस्ते करण्यात आले, तर संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. पल्लवी बनसोडे उपस्थित होत्या.
​ ​संमेलनाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवयित्री उषा परब यांनी केले. “स्त्रियांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या संस्था खूप कमी आहेत, त्याला ‘कोमसाप’ हा अपवाद आहे. महिलांची लेखनाची दिशा आणि दशा समजून घेण्यासाठी अशा संमेलनांची गरज आहे. या १९ व्या संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यातील कवयित्री एकत्र येतात, ही आनंदाची बाब आहे,” असे त्यांनी नमूद केले.
​ ‌​या सोहळ्याला पुजा दिवाण, श्रृती हजारे, डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. लता कदम, सरिता पवार, डॉ. सई लळीत, मनिषा पाटील, ॲड. अंजली मुतालिक, मिनाक्षी अळवणी, आर्या बागवे, श्वेतल परब, मेघना राऊळ, मंगल नाईक जोशी, ऋतुजा भोसले, प्रा. शालिनी मोहळ यांसह अनेक मान्यवर कवयित्री उपस्थित होत्या. संमेलनादरम्यान कवयित्री व ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच ‘आरती’ मासिकाच्या श्रिया भागवत यांनी कथालेखन स्पर्धेचे निकाल जाहीर करून विजेत्यांचा गौरव केला.
​ ​कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रज्ञा मातोंडकर यांनी कवयित्रींच्या काव्यमैफलीचे बहारदार सूत्रसंचालन केले. यामध्ये आर्या बागवे, आदिती मसुरकर, चिन्मयी कुलकर्णी यांच्यासह अनेक निमंत्रित कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख श्वेतल परब आणि ऋतुजा भोसले यांनी करून दिली. आरती मासिकचे भरत गावडे, श्रीराम वाचन मंदिर कार्यवाह रमेश बोंद्रे, कोमसाप शाखा उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी उपस्थित कवयित्रींचा यथोचित सन्मान केला.
संमेलन आयोजक कवयित्री उषा परब यांनी कवयित्री उद्घाटक कालिका बापट आणि डॉ पल्लवी बनसोडे व मान्यवर कवयित्रीचा सत्कार केला.

​

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे