सातारा दुचाकी अपघातात दोन युवकांचा मृत्यू
सातारा/
महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेची माहिती घेऊन परत येत असताना दोन तरुणांवर काळाने झडप घातली. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोन्ही तरूणांचा मृत्यू झाला. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील सारोळा परिसरात हा अपघात झाला. अथर्व विजय पाटील (वय १७, रा. शिरवळ, ता. खंडाळा) आणि तुषार दादासाहेब शिंदे (वय १७, रा. नायगाव, ता. खंडाळा), अशी अपघातातील मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.


