उत्तूर जवळ अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर मुमेवाडीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. चौघांच्या जागीच मृत्यू झाल्यानंतर आजरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरच्या उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर भीषण अपघात झाला. महामार्गावर दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. व्होन्याळी गावचे चांदे कुटुंबीय दुंडगे गृहप्रवेशासाठी गावाला जात होते. मृत पावलेल्यांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.
दिपक दत्तात्रय चांदे(४५), शोभा चांदे(४२),जय दिपक चांदे(९) पुर्वा दि. चांदे (६) अशी मृत पावलेंच्या नावे आहेत.


