न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

विजय चव्हाण यांची पदोन्नती म्हणजे प्रामाणिकपणाचे फळ: सुनील राऊळ 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विजय चव्हाण यांनी सावंतवाडी व दोडामार्ग या तालुक्यात गेली 23 वर्षे जनतेला अभिप्रेत असलेले काम प्रामाणिक आणि उत्कृष्टपणे केले. या प्रमाणिकपणाचे फळ म्हणून त्यांची उपविभागीय अभियंता म्हणून पदोन्नती झाली आहे. हि खरोखरच आनंदाची बाब आहे. यापुढेही श्री. चव्हाण हे निश्चितपणे चांगले काम करतील असा विश्वास सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सैनिक पतसंस्थेचे महा सरव्यवस्थापक सुनील राऊळ यांनी व्यक्त केला.

विजय नामदेव चव्हाण यांना उपविभागीय अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्ला येथे बढती मिळाली आहे. सह्याद्री फाउंडेशन तर्फे सावंतवाडी येथे श्री. चव्हाण सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. राऊळ बोलत होते.

सह्याद्री फाउंडेशन तर्फे श्री. चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद सावंत, ॲड. संतोष सावंत, हर्षवर्धन धारणकर, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, अशोक सांगेलकर, गजानन बांदेकर, सुनील खानोलकर उपस्थित होते. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, गेले 23 वर्ष मी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात काम केले. येथील जनतेचे व सर्वांचे चांगले सहकार्य मला मिळाले. वेंगुर्ले उपविभागीय कार्यालयात माझी झालेली बढती ही निश्चितच मी सार्थकी लावेन. सह्याद्री फाउंडेशनने माझा हा सन्मान केला याबद्दल मी ऋणी आहे.

विजय चव्हाण हे प्रामाणिक अधिकारी असून त्यांनी सह्याद्री फाउंडेशन मध्ये चांगले काम केले आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे आणि एखादे काम तडीस नेणे ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. असे विचार यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, संतोष सावंत, प्रमोद सावंत खजिनदार हर्षवर्धन धारणकर यांनी व्यक्त केले. त्यांनी असे चांगले काम करत रहावे अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे