सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता दूतांची मोफत आरोग्य तपासणी
सिंधुदुर्ग / राजू तावडे
नगरपरिषद व हॉस्पिटल सावंतवाडी शहर स्वच्छता दूतांसाठी तसेच गावातील कष्टकरी भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिधा वाटप व मोफत मेडिकल कॅम्पचे आयोजन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सावंतवाडी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निसर्गप्रेमी प्रसाद गावडे (रानमाणूस), डॉक्टर उमेश मसुरकर, डॉ. हर्ष ईश्वरा साळगावकर यांची उपस्थिती असणार आहे .
हि कार्यक्रम ७ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता गोविंद चित्रमंदिरच्या हॉलमध्ये होणार आहे. तसेच स्वच्छता दूतांसाठी मेडिकल कॅम्प त्याच ठिकाणी ठीक 3 वाजता सुरू करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सल्लागार व उद्योजक शैलेश पै,अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील, खजिनदार रवी जाधव रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम यांनी केले आहे. संस्थेचे सदस्य हेलन निबरे, शामराव हळदणकर, वकील अशोक पेडणेकर, शेखर सुभेदार, शरदिनी बागवे,सुजय सावंत, प्रा.प्रसाद कोदे, शरद पेडणेकर यांचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभले आहे. या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ समाजसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.


