न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे जनतेला ‘बुरे दिन’: माजी आमदार परशुराम उपरकर

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदारांचे तब्बल साडेचारशे कोटी रुपयांचे देणे थकित असताना, नियोजन विभागाकडे केवळ १० टक्के निधी उपलब्ध आहे. सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे जनतेला ‘अच्छे दिन’ऐवजी ‘बुरे दिन’ अनुभवावे लागत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आमदार व खासदार केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यात मग्न आहेत. प्रत्यक्षात विकासकामांसाठी निधीच उपलब्ध नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम यांनी सावंतवाडी येथे आज शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या राणे कुटुंबीयांवर बोलताना उपरकर म्हणाले, “२५ वर्षे सत्तेत राहूनही मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. तळ कोकणावर केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय होत असून महामार्गाचे रखडलेले काम हे या सरकारचे लज्जास्पद अपयश आहे.”
जिल्ह्यात फोफावलेल्या अनैतिक धंद्यांवर भाष्य करताना उपरकर म्हणाले, “जिल्ह्यात दारू, मटका, जुगार, ड्रग्ज आणि गांजाचा सुकाळ झाला असून बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्येकडे वळत आहेत. केवळ वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देऊन अवैध धंदे बंद होत नसतात. त्यामुळे सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेऊन हे बेकायदेशीर धंदे रोखावेत. त्यांनी हे धंदे बंद केल्यास आम्ही स्वतः जाहिरात देऊन त्यांचा सत्कार करू,” असा थेट इशारा त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला दिला.
शासकीय सुविधांच्या बोजवारा उडाला असून महिला कार्डसाठी महिलांची मोठी गर्दी होत असली तरी त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. एसटी प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत देताना वाहकांची दमछाक होत असून लाडक्या बहिणींच्या खात्यावर वेळेवर पैसे जमा होत नाहीत. परिस्थिती इतकी बिकट आहे की निधीअभावी कणकवली व कुडाळ एसटी डेपो बंद करण्याची वेळ आली आहे. असे उपरकर म्हणाले.
पक्षांतर्गत विषयांवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “शिवसेनेच्या जुन्या-नवीन नावांवरून वाद निर्माण करण्याची गरज नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुरुवातीपासूनच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. नवनवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची ही केवळ संघटनात्मक प्रक्रिया आहे.” येत्या गणेशोत्सवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला युवासेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार, आबा चीपकर, सुरेंद्र कोठावळे, नाना सावंत, आदेश सावंत, रोहित मुळीक, विनायक कवडेकर, संजय सावंत आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे