नांदेड जिल्हा दुष्काळाच्या छायेत…
नांदेड / वृत्तसंस्था
नांदेड जिल्ह्यात मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी खरिप हंगामातील पिके धोक्यात आली असून सोयाबीनच्या पिकाने माना टाकण्यास सुरुवात केली आहे. ऐन बहरात असलेल्या सोयाबीनला पावसाची गरज असताना पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


