न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गोकुळ दूध संघाच्या उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र देण्यावरुन वाद पेटला

कोल्हापूर/

गोकुळ दूध संघाच्या दूध, तूप, लोणी (बटर) आणि दूध पावडर या उत्पादनांसाठी मुंबईस्थित ‘ज्युहफ सर्टिफिकेशन प्रायव्हेट लिमिटेड’ (जमिअत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट) या संस्थेकडून हे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. ज्याची वैधता १८ मार्च २०२८ पर्यंत आहे. यावरुन सर्वसामान्य ग्राहक आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शुद्ध शाकाहारी असलेल्या दुग्धजन्य उत्पादनांना हलाल प्रमाणपत्राची गरज काय, असा संतप्त सवाल सोशल मीडियावर सर्वसामान्य ग्राहक आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून विचारला जात आहे. हा निर्णय महायुती सरकारमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र साजिद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष असताना घेण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. विरोधकांच्या मते, हा हिंदू ग्राहकांच्या धार्मिक अस्मितेशी जोडलेला मुद्दा असून निवडणुकीत यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची तयारी सुरू आहे.

या वाढत्या वादावर गोकुळ दूध संघ आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यावसायिक स्पष्टीकरण देत विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. गोकुळ प्रशासनाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, हलाल प्रमाणपत्र हे कोणत्याही धार्मिक प्रचाराशी संबंधित नसून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक असलेले केवळ एक तांत्रिक व गुणवत्ता मानक आहे, असे गोकुळ प्रशासनाने सांगितले.

गोकुळचे तूप, लोणी आणि दूध पावडर मोठ्या प्रमाणावर अझरबैजान, सौदी अरेबिया, युएई, ओमान, कतार, कुवेत, तुर्की, जॉर्डन, सिरिया आणि बांगलादेश या आखाती (गल्फ) व इस्लामिक देशांमध्ये निर्यात केले जाते. या देशांच्या अधिकृत व्यापार नियमांनुसार, ‘हलाल प्रमाणपत्र’ असल्याशिवाय तिथे कोणत्याही अन्नपदार्थांच्या आयातीला परवानगी मिळत नाही. हे FSSAI किंवा ISO प्रमाणपत्रासारखेच एक व्यावसायिक मानक असून, उत्पादनात कोणतेही प्रतिबंधित किंवा मांसयुक्त घटक वापरलेले नाहीत, याची ती केवळ तांत्रिक खात्री असते. देशातील अमूल आणि मदर डेअरीनेही हे मानक स्वीकारले आहे. परदेशी निर्यात वाढल्यामुळे संघाला परकीय चलन मिळते, ज्याचा थेट फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यात होतो, असेही गोकुळने म्हटले.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे