न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आडाळी एमआयडीसीत २५० कोटीचा प्रकल्प येणार : आमदार दीपक केसरकर 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे

  माजी मंत्री आमदार श्री.दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी येथे एक नवीन कारखान्याचा प्रस्ताव ऑटोमेज कंपनीने सादर केलेला आहे. मंगळवारी मुंबई येथे ऑटोमिक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अतीन अग्रवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रवींद्र रणसिंग यांच्यासोबत आमदार श्री.दीपक केसरकर यांची बैठक झाली. ऑटोमेज कंपनी मार्फत २५० कोटी रुपयांची आडाळी येथे गुंतवणूक करण्यात येणार आहे. या कारखान्याच्या माध्यमातून ५०० पेक्षा अधिक तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. भारतामध्ये या कंपनीचे विविध ठिकाणी पाच कारखाने सुरु आहेत आहेत. तसेच परदेशातही एक कारखाना सुरु आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे