न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आरोस येथील अभंग गायन स्पर्धेत दक्षता घोगळे व श्रुती सावंत प्रथम

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील गिरोबा रंगमंचावर गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ, आरोस आयोजित अभंग गायन स्पर्धा दिनांक १९ व २० मार्च रोजी मोठ्या दिमाखात पार पडली. ही स्पर्धा बालगट व मोठा गट अशा दोन विभागात घेण्यात आली. या स्पर्धेत बाल गटात कु.दक्षता बाबुराव घोगळे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर मोठ्या गटात कुडाळ येथील कु.श्रुती सावंत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक संजु परब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आरोंदा जि.प.सदस्य सुदन कवठणकर, मळेवाड जि.प. सदस्या सौ. अपर्णा प्रभू , सातार्डा पं. स. सदस्य उदय पारिपत्ये, मळेवाड पं. स. सदस्या सौ. धनश्री मराठे, आरोंदा पं. स.सदस्या सौ. स्नेहा कांबळी, न्हावेली पं.स.सदस्य श्री. शरद धाऊसस्कर, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर, शिवसेना युवा तालुकाध्यक्ष क्लेटन फर्नांडिस, बाळा शिरसाट, निलेश उर्फ बाळा परब, निखिल नाईक, प्रसाद नाईक उपस्थित होते.
दिनांक १९ मार्च रोजी झालेल्या बाल गट स्पर्धेत द्वितीय क्रमांक कु.चिन्मयी मेस्त्री आणि तृतीय कु.सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर याने पटकावला. कु. अथर्व चंद्रकांत पिकुळकर व कु.सान्वी धोंडी गावडे यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविले. बाल गटातील स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रशांत धोंड, माणगाव यांनी केले. दिनांक २० मार्च रोजी झालेल्या मोठ्या गटातील स्पर्धेत पूर्वा धाकोरकर, सावंतवाडी हिने द्वितीय क्रमांक तर कुडाळ येथील सुखी श्रीकृष्ण सामंत हिने तृतीय क्रमांक पटकावला. ऋचा संजय पिळणकर, माणगाव, रिया मेस्त्री, आरवली व सुनील गोवेकर, मळेवाड यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आली. स्पर्धेसाठी बाल गटातील सर्व रोख बक्षिसे आरोस येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश उर्फ बाळा परब कुटुंबियांनी पुरस्कृत केली होती तर मोठ्या गटातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मनोज नाईक, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस दीपक पटेकर , सावंतवाडी, तृतीय क्रमांक बक्षीस संदेश देऊलकर, तर उत्तेजनार्थ बक्षिसे रुपेश दळवी व वीरेंद्र नाईक, सत्यवान नाईक यांनी पुरस्कृत केली होती.
या स्पर्धेचे परीक्षण गायक श्री. श्रीपाद चोडणकर व श्री.स्वप्निल गोरे यांनी केले तर गायकांना संगीत साथ श्री. निलेश मेस्त्री हार्मोनियम, किशोर सावंत तबला व भास्कर मेस्त्री यांनी ताल साथ दिली. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री.निखिल नाईक, श्री. प्रसाद नाईक, महेश कुबल, निलेश तथा बाळा परब सह श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे