न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

छप्पर मोडकळीस आलेल्या इन्सुली शाळेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पहाणी

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याकडे इन्सुली जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ च्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी शनिवारी इन्सुली शाळा क्रमांक २ ला भेट देऊन शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीमध्ये शाळेची इमारत व छप्पर मोडकळीस आल्याने, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.

याबाबत जि. प. सदस्य नितीन राऊळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याकडे पाठपुरावा करत, आपण स्वतः शाळेची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी विनंती केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी पाहणीनंतर शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य . सदाशिव राणे, सरपंच . गंगाराम वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी निलेश जाधव ग्रामविस्तार अधिकारी, अंकुश जंगले, व सावंत , ग्रामपंचायत अधिकारी चौहान, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, केंद्रप्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर झाल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुस्थितीत शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार असून, स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. नितीन राऊत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शाळेची पाहणी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे