न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली शाळेचा निकाल १०० टक्के

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज आंबोलीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १० च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेने सलग १८ व्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून २८ विद्यार्थ्यी विशेष श्रेणीत तर उर्वरीत सर्व २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये शाळेमधून कॅडेट वेदांत दिपक महाडीक ९४.२० व कॅडेट पार्थ निलेश सांडव ९४.२० गुण मिळवून प्रथम क्रमांक व कॅडेट जगन्मय कमलेश कांबळी याने ९४.०० टक्के गुण मिळवून द्वितीय तर कॅडेट सतेज नानराण पाटील याने ९२.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक व कॅडेट ओंकार नामदेव धुरी याने ९१.०० टक्के गुण निळविले आहेत. आतापर्यंत अनेक विद्याव्यांनी NDA लेखी परिक्षेत तसेच JEE CET, NEET परीक्षेत यश प्राप्त केले आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी आर्मी नेवी, मर्चेंट नेवी बहुराष्ट्रीय कंपनी आदी क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. शाळेत निवासी सैन्य प्रशिक्षण, कवायत, युद्ध कौशल्य, आत्मसंरक्षण, विविध साहसी खेळ व स्पर्धात्मक परीक्षांचे मागर्दशन केले जाते. १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखल्या बाबत संस्थेचे अध्यक्ष सुनिल राऊळ व सचिव जॉय डॉन्टस तसेच संचालक शंकर गावड़े, शिवाजी परब व सर्व संचालक कार्यालयीन सचिव दिपक राऊळ, सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री. नितीन गावडे व वर्ग शिक्षक मायाप्पा शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे