दुचाकी ओढ्यात पडून युवतीचा मृत्यू… खेड दापोली मार्गावरील घटना
रत्नागिरी/ वृत्तसंस्था
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड राज्यमार्गावर २८ जुलै रोजी मंगळवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात एका युवरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड राज्यमार्गावर २८ जुलै रोजी मंगळवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात एका युवतीचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. खेडच्या दिशेने निघालेल्या दोन मैत्रिणींच्या दुचाकी गाडीला झालेल्या मोठ्या अपघातात एका पंचवीस वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सेजल संदीप भागवत असं मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.तीचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. खेडच्या दिशेने निघालेल्या दोन मैत्रिणींच्या दुचाकी गाडीला झालेल्या मोठ्या अपघातात एका पंचवीस वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सेजल संदीप भागवत असं मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.
दापोलीहून खेडच्या दिशेने निघालेल्या या दोघी मैत्रिणी आपल्या दुचाकीवरून जात असताना शिरसिंगे फाट्याजवळ अपघाताची घटना घडली. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओढ्यामध्ये पडली. गाडीच्या अपघाताच्या आवाज येताच घटनास्थळापासून जवळ राहणारे प्रशांत पवार आणि काही ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सेजल ही बीएससी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला होती. तिने नुकतीच 25 जुलै रोजी आपल्या बीएससी नर्सिंग या कोर्सची लास्ट इयरची एक्झाम दिली होती. सेजल लास्ट इयरची एक्झाम झाल्याने आनंदात होती. मात्र हा आनंद क्षणभंगुर ठरला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नर्स होण्याचे तिचे स्वप्न होतं. मात्र निष्ठुर नियतीने तिला या अपघातात हिरावून नेल्याने तिचे स्वप्न अधुरे राहिल आहे.


