न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पुण्यात सिलिंडरमध्ये पाणी

पुणे/ गौरी देसाई

पुण्यातील पर्वती परिसरातील ‘जय भवानी जनता वसाहत’ येथे घरगुती गॅस सिलेंडरबाबत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील अनेक नागरिकांनी गॅसच्या सिलेंडरमधून गॅसऐवजी तब्बल ३ ते ४ लिटर पाणी बाहेर आल्याची तक्रार केली आहे. आधीच मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांमध्ये या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची दखल स्थानिक समाजसेविका नाज इनामदार यांनी घेतली असून त्यांनी संबंधित गॅस एजन्सीविरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांच्या मते, हा प्रकार एखाद्या एकट्या ग्राहकासोबत घडलेला नसून अशा अनेक तक्रारी एजन्सीकडे पूर्वीपासून दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून फसवणुकीचा भाग आहे”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे