कु.वरद याची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
नुकत्याच मुंबई, वरळी येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र एअरगन कॉम्पिटिशन मध्ये वेंगुर्ला येथील कु.वरद विश्वनाथ जगताप याने सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने पीप साईट प्रकारांमधील सब युथ गटात सहभाग घेतला होता. त्याची ऑल इंडिया जी.वी.मावलनकर ( पंजाब ), वेस्टझोन शूटिंग चॅम्पियनशिप (गोवा ) व इंडिया ओपन शूटिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो वेंगुर्ली येथील उपरकर शूटिंग अकॅडमी येथे सराव करत असून त्याला प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले.
या निवडी बद्दल आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व नॅशनल रायफल असोसिएशनचे खजिनदार श्री.विक्रम भांगले,वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री राजन गिरप तसेच सिधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


