न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जिल्ह्यातील डॉक्टरांची रिक्त पदे लवकरच भरली जातील: आरोग्यमंत्र्याचे ओएसडी डॉ. स्वप्नील सांगळे 

 

 

सिंधुदुर्ग /राजू तावडे 

     जिल्हातील आरोग्य समस्यांवर आरोग्यमंत्र्यांचे लक्ष आहे. त्यामुळेच त्यांनी मला सर्व गोष्टीचा सविस्तर आढावा घेऊन अडचणींची सर्व माहिती घेऊन शासन स्तरावर त्वरित उपाययोजना करण्याच्या दृष्टीनेच आरोग्यमंत्र्यांनी मला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाठविले आहे. दोन दिवसापासून मी जिल्ह्यात असून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला आहे. डॉक्टरांची रिक्त पदे येणाऱ्या काळात भरली जातील. दीड हजार डॉक्टरांची भरती होणार असून त्यात कोकणाला प्राधान्य दिले जाईल, जास्तीत जास्त डॉक्टर्स उपलब्ध होतील व इतरही समस्या दूर होतील असा विश्वास आरोग्यमंत्र्याचे ओएसडी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी व्यक्त केला. शनिवारी त्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी सावंतवाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी यांनी समस्यांकडे डॉ. सांगळे यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी प्रसुती विभाग, आयसीयू, ब्लड बँक, कॅज्युअल्टी, सीटी स्कॅन सेंटर सह विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. तेथील समस्या जाणून घेत आवश्यक सुचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सभापती सुस्मिता जाधव, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी देव्या सुर्याजी, वैद्यकीय अधिकारी

डॉ. सुबोध इंगळे, डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखील अवधूत, नगरसेवक बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, सुरज परब आदींसह शिवसेना पदाधिकारी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी ओएसडी डॉ. सांगळे म्हणाले, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मी समस्या जाणून घेतल्या असून काही गोष्टी तात्काळ सोडवण्यासाठी आवश्यक सुचना दिलेल्या आहेत. प्रायव्हेट प्रॉपर्टीतील स्वच्छतेची व्यवस्थित निग्रानी केली जात नसल्याने त्यासंदर्भात नोटीस बजावण्यास सांगितले आहे‌. आयसीयू, ब्लड बँक, कॅज्युअल्टीतील समस्या दूर करण्यासाठी आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. डॉक्टर्सच्या स्पेशालिटीची उपलब्धता इथे असून ऑपरेशन थिएटर सुसज्ज आहे. लॅब टेक्निशियनसह अजून काही पदे आवश्यक आहेत. शासनांतर्गत पाठपुरावा करून बाकीचे पदे भरण्यासाठी आपण त्वरित कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे पालकमंत्री नितेश राणे, आम.दीपक केसरकर, आम.निलेश राणे यांनी ज्या गोष्टींवर लक्ष वेधले त्यावर एकत्रित काम करण्यासाठी मला हा टास्क आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे. त्यादृष्टीने बऱ्याच उपाययोजना स्थानिक पातळीवर आम्ही वर्कआउट केलेल्या आहेत. ज्या वरिष्ठ पातळीवरून, राज्य पातळीवरून काम करायचे आहे ते मुंबई गेल्यानंतर सर्व फॉलोअप घेऊन होतील. त्याचे रिजल्ट्स ग्राउंडवर दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भातला, स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याने जागेचा प्रश्न सुटलेला आहे. निधी आणि त्याची मान्यता तर झालेलीच आहे. आता सध्या जे कार्यान्वित रूम आहे त्याच्या शिफ्टिंगसाठीचे आम्हाला पर्यायी उपाययोजना काय करता येते, याचा थोडा अभ्यास चालला आहे. हे सगळे झाल्यानंतर एक सुसज्ज 100 बेडचे स्पेशालिटी हॉस्पिटल येणाऱ्या काळात सावंतवाडीच्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास डॉ. सांगळे यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून समस्या जाणुन घेतल्याबद्दल डॉ. सांगळे यांचे आभार मानले.‌ काही सुविधा १५ दिवसात पूर्ववत करण्यासाठी आवश्यक सुचना त्यांनी दिलेल्या आहेत. संपूर्ण मतदारसंघातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या असून येणाऱ्या काळात आरोग्याचे प्रश्न निश्चितपणे मिटतील असा विश्वास श्री. परब यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे