वाघोलीत अतिक्रमणावर बुलडोझर
पुणे/ गौरी देसाई
पुणे महानगरपालिकेच्या वतीने आज वाघोली परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली. सरहद्दीतील अनधिकृत बांधकामे, दुकाने आणि इतर आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबवत अनेक आस्थापनांवर बुलडोझर चालवला. यावेळी काही ठिकाणी स्थानिकांकडून विरोध झाल्याचेही समोर आले, मात्र प्रशासनाने कारवाई कायम ठेवली.
अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, तसेच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील काळातही अशीच मोहीम सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
“अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे. अन्यथा अशा प्रकारची कारवाई पुढेही करण्यात येईल.”
वाघोलीतील या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या या मोहिमेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे


