कोल्हापूरी गुळा बाबत गुजरातमध्ये आक्षेप
कोल्हापूर/
गुजरातमध्ये कोल्हापुरी गुळा संदर्भात आक्षेप घेण्यात आला आहे. गुळात रासायनिक रंग असल्याचा ठपका गुजरातच्या अन्न आणि औषध प्रशासनाने ठेवला आहे. गुजरातमध्ये पाठवलेल्या गुळामध्ये रासायनिक रंग आढळल्याचे कारण देत गुजरात मधील दोन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापुरातील गुळ व्यापारी यांनी कोल्हापुरी गुळाबद्दल आक्षेप नोंदवला. कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही काळ गुळाचे खरेदी बंद करून व्यापाऱ्यांनी आक्षेप नोंदवला. नैसर्गिक रंगातील गुळ खरेदीला प्राधान्य देणार, अशी भूमिका कोल्हापुरातील गुळ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी घेतली आहे.


