न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जल, जंगल संवर्धनाचा शिमगोत्सव संकल्प, कोलझरमधील उत्सव

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

कोलझर येथे शिमगोत्सवाच्या सांगता सोहळ्याची सुरूवातच जल, जंगल संवर्धनाच्या संकल्पनेने करण्यात आली. गाव आणि गावचे गावपण वाचवण्यासाठी पर्यावरण रक्षणाचा गावाने केलेल्या एकजुटीच्या निर्णयाला यश मिळावे असे साकडे यावेळी घालण्यात आले.
कोलझर गावचा शिमगोत्सव यंदा निसर्ग रक्षणाच्या गावाने सुरू केलेल्या चळवळीमुळे चर्चेचा ठरला. या गावातील डोंगरातील जमिन काही बाहेरील गुंतवणुकदारांनी घेवून स्थानिकांना विश्‍वासात न घेता वृक्षतोड तसेच अवैध उत्खनन केले होते. याला गावाने एकत्र येत विरोध केला. भविष्यात येथील निसर्गावर घाला येवू नये यासाठी गावच्या जमिनी विकणार नाही असा संकल्प केला. कोलझर गावाने घेतलेल्या या भुमिकेचे राज्यभर कौतुक झाले होते. या पार्श्‍वभूमीवर येथील वार्षिक शिमगोत्सव झाला. या निसर्ग रक्षण चळवळीची किनार या उत्सवातही दिसली.
येथे सात दिवसांचा उत्सव असतो. शिमगोत्सवाच्या सांगतेचा मुख्य सोहळा काल (ता.११) रात्री उशिरा झाला. न्हावाण (तीर्थ) सोहळ्याला या उत्सवात सर्वाधीक महत्त्व असते. यासाठी चाकरमानी तसेच माहेरवासिणी, पाहुणे स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देवासमोर घातल्या जाणार्‍या गार्‍हाण्याला विशेष महत्त्व असते. या सोहळ्याची सुरूवातच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी गावाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी गावाने उचललेल्या पावलाला बळ मिळावे असे गार्‍हाणे घालून केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे