न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सामाजिक बांधिलकीला डॉ.हर्ष सागावकर यांच्या कडून ५ फाउलर बेड 

 

सिंधुदूर्ग / राजू तावडे 

 सावंतवाडी येथील डॉक्टर हर्ष ईश्वरा सागावकर यांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मार्फत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णसेवेसाठी नव्या पाच फाउलर बेड देणगी स्वरूपात दिल्या.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना त्यांच्या सेवे बरोबरच विविध प्रकारच्या रुग्णपयोगी वस्तू देखील या संस्थेच्या माध्यमातून पुरवले जातात. रुग्णांच्या सेवेसाठी फाउलर बेडचा तुटवडा नेहमी भासत असते अशावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी डॉक्टर हर्ष ईश्वरा सागावकर यांच्याकडे फाउलर बेडची मागणी केली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता संस्थेला सुमारे ६० हजार रुपये किमतीचे पाच नवे कोरे फाउलर बेड देणगी स्वरूपात दिले. त्यामुळे आता रुग्णांना संस्थेच्या माध्यमातून सेवा उपलब्ध होणार आहे. तरी गरजूंनी या रुग्णपयोगी वस्तूंचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी रवी जाधव, रूपामुद्राळे, समीरा खलील, शेखर सुभेदार यांनी केला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे यांनी डॉक्टर हर्ष ईश्वरा सागावकर यांचे आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे