शेर्ले येथील नवीन जाधव याचे सीबीएससी शालांत परीक्षेत यश
सिंधुदुर्ग /राजू तावडे
सिद्धार्थ नगर शेर्ले येथील नवीन सुरेश जाधव याने नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालयाच्या शालांत परीक्षेत 92 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पत्रकार मोहन जाधव आणि सिद्धार्थनगर वाडीतील अनेक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवीन हा गरीब कुटुंबातील असून लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने आईने मोलमजुरी करून त्याला शिक्षण दिले. सांगेली नवोदय विद्यालयात त्याला सहावीत गुणानुक्रमे प्रवेश मिळाला होता. भविष्यात नवोदय विद्यालयात बारावी शास्त्र अभ्यासक्रम पूर्ण करून एनडीए सारख्या परीक्षेत सामोरे जाण्याचे स्वप्न नवीन याने व्यक्त केले आहे.


