वारीत भरधाव ट्रकने सांगलीतील चार वारकऱ्यांना चिरडले…. जेजुरीतील घटना
पुणे/ वृत्तसंस्था
पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीतमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना भरधाव ट्रकने चिरडलं. जेजुरीतील महामार्गावर ही घटना घडली. या अपघातामध्ये ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे जेजुरीत एकच गोंधळ उडाला.जेजुरीजवळ सासवडे गावात अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. एका प्रत्यक्षदर्शीनुसार, भरधाव टेम्पो अचानक दिंडीत घुसला. या टेम्पोच्या धडकेत 15 ते 16 वारकरी जखमी झाले. त्यातील तिघांचा मृत्यू झाला. तर काही गंभीर जखमी आहेत. त्यातील काहींची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमधील महिला सांगलीच्या दिग्रस परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरीमध्ये माऊलींच्या वारीत पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव टॅकने जोरदार धडक दिली. पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळ ही अपघाताची घटना घडली. ट्रकच्या धडकेत ६ वारकरी गंभीर जखमी झाले होते. यामधील ४ वारकऱ्यांचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर दोन वारकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
माऊलींची पालखीने आज सासवडवरून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. जेजुरीत दाखल झाल्यावर पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते. अशातच हा अपघातझाला. वारीमधीलच ट्रक वारकऱ्यांच्या गर्दीत घुसला. ट्रकने अनेक वारकऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये ३ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि सर्वांची पळापळ झाली.


