न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

होळी दिवशीच रक्ताचा सडा… कौटुंबिक वादातून चौघांची हत्या…

कानपूर/ वृत्तसंस्था

 होळीच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशच्या बहराइचमधील बसंतपूर उदल गावामध्ये सहा जणांवर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. भावांमध्ये वाद झाला त्या वादानंतर हत्याकांडाची ही घटना घडली. ज्या व्यक्तींवर हल्ला करण्यात आला त्यांच्या कुटुंबातील एक लहान मुलगाच सुखरूप बचावला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी त्याला सोबत नेले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास घडली. मध्यरात्री कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. कुऱ्हाडीने सर्वांवर वार करण्यात आले. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घरातून अचानक ओरडण्याचा आवाज आला. लोकांना काय घडत आहे हे समजले तोपर्यंत अंगण रक्ताने माखले होते. घरात सगळीकडे रक्ताचे पाट वाहत होते. शीतला (८२ वर्षे), संजू देवी (६० वर्षे), पार्वती (२० वर्षे) आणि बदलूराम (६२ वर्षे) या चौघांची हत्या करण्यात आली. घरातील अंगणामध्ये एका बाजूला नवरा-बायको आणि दुसऱ्या बाजूला आई आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.”

या हल्ल्यात जास्त रक्तस्राव झाल्यामुळो चौघांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात गुरुदेव (४० वर्षे) आणि निरंकर (३० वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. निरंजनची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. कौटुंबिक आणि मालमत्तेच्या संदर्भातील वादातून ही घटना घडली. आरोपी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे