मोहोळ जवळ अपघातात पनवेलमधील पाच जण ठार
सोलापूर/
पनवेलवरून अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातलाय. पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळमध्ये एका कारचा शनिवारी रात्री भयंकर अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर मोहोळमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये ३ पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे. सर्वजण पनवेलहून एरटिका कारने (MH-46 Z 4536) अक्कलकोलटला देवदर्शनला जात होते, त्यावेळी मोहोळमधील देवडी पाटी येथे भंयकर अपघात झाला.
पुणे–सोलापूर महामार्गावर मोहोळमध्ये एरटिका कार आल्यानंतर चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जोरदार आदळली. या भयंकर अपघातात ३ पुरूष आणि २ महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मोहोळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी महिलेला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले


