न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

वैश्यवाडा गणेशोत्सवातअंगारकी संकष्टी दिनी सामुदायीक अथर्वशीर्ष पठण व सहस्र मोदक नैवेद्य 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

     वैश्यवाडा, सावंतवाडी येथील २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात संकष्टीचा योग अंगारक आल्याने मंगळवारी दि. २९ सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टी दिनी सामुदायीक अथर्वशीर्ष पठण व सहस्र मोदक नैवेद्य अर्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री हनुमान मंदिरात सुरू असलेल्या या गणेशोत्सवात अंगारकी संकष्टी दिनी सकाळी ७:०० वाजता सामाुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार असून दुपारी १:०० वाजता महाआरती व त्यानंतर श्री चरणी सहस्र मोदक अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या गणेशोत्सवात रोज भजनादी कार्यक्रम सुरू असून त्यात धोंडी दळवी, म्हापसेकर बंधू, महादेव गावडे, उत्सव समिती, वैभव म्हापसेकर, शरद सुकी, महावीर चेंडके, बाळगोपाळ मित्रमंडळ, राजेंद्र म्हापसेकर, प्रकाश मिशाळ, प्रकाश सुकी यांनी सहभाग घेतला असून लघुरुद्र पूजा अण्णा म्हापसेकर, पंचखाद्य प्रसाद डॉ. दादा केसरकर यांच्याकडून होणार आहे.

रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्रींची भव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार असून त्यात आकर्षक देखावे तसेच विविध कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे केले जाणार आहेत.

या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद कोदे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे