न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आजगावात कदंबा ला अपघात.. चालकाच्या प्रसंगावधानाने ४५ प्रवासी सुखरूप

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

 पणजी येथून सायंकाळी साडेचार वाजता सुटलेली कदंब बस शिरोडामार्गे वेंगुर्ल्याच्या दिशेने येत असताना आजगाव येथील वाघबिळा जवळील धोकादायक वळणावर मोठा अपघात टळला. समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात एका दुचाकीस्वाराने अचानक धोकादायक पद्धतीने बससमोर वाहन आणले. प्रसंगावधान राखत बसचालकांनी तत्काळ बस वळवली. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला कलंडली, मात्र मोठी दुर्घटना टळली.

ज्या ठिकाणी बस कलंडली, तेथून अवघ्या काही फुटांवर सुमारे २०० फूट खोल दरी असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. मात्र चालकाच्या समयसूचकतेमुळे बस दरीत कोसळण्यापासून वाचली आणि ४५ प्रवाशांचे प्राण सुरक्षित राहिले.

अपघातानंतर चालक धनंजय आसोलकर आणि वाहक सर्वेश नाईक यांनी तत्काळ आपत्कालीन दरवाजा उघडून बसमधील सर्व ४५ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याची नोंद नाही. दरम्यान, ज्याला वाचविण्यासाठी बसचालकाने प्रसंगावधान दाखविले तो दुचाकीस्वार मात्र घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे