न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भोसले सैनिक स्कूलमध्ये ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्यात ’ महिलांचा गौरव

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त संस्थेच्या उभारणीत आणि शैक्षणिक वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी ‘नवदुर्गा सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात संस्थेच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले यांना ‘बीकेसीच्या तेजस्विनी’, सुनेत्रा फाटक यांना ‘कर्मयोगी नवदुर्गा’, प्रियंका देसाई यांना ‘संगोपनशील दुर्गा’, प्राची कुडतरकर यांना ‘संस्कृती व नेतृत्वशक्ती’, प्रीती डोंगरे यांना ‘अचूकतेचा आधारस्तंभ’ तर वैशाली आरोसकर यांना ‘कार्यक्षमतेचा आधारस्तंभ’ म्हणून सन्मानित करण्यात आले. मारिया फर्नांडिस, अपर्णा केदार आणि रंजना बोयान यांचा ‘सेवाशक्ती’ म्हणून गौरव करण्यात आला.

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलपासून ते यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या उभारणीपर्यंत विविध टप्प्यांवर या सर्व महिलांनी दिलेले योगदान, त्यांची मेहनत, समर्पण आणि सेवाभाव यांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. शौर्य केवळ रणांगणावर दाखवायचे नसते तर शिक्षण आणि समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने केलेल्या सेवेतूनही ते व्यक्त होते हा संदेश छात्रसैनिकांना या सोहळ्यातून मिळाला. यावेळी शाळेचे कमांडंट ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे