न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कोट्यावधीच्या योगा सेंटरची तोडफोड करणार का? नगरसेवक देव्या सुर्याजीचा सवाल

सिंधुदुर्ग / राजू तावडे

योगा मेडीटेशन सेंटरच्या इमारती खाली पाण्याची नैसर्गिक स्त्रोताची पाईपलाईन असून ती फुटली आहे. काम करण्यापूर्वी ती अन्यत्र मार्गाने हलवण आवश्यक होत. मात्र, बांधकाम व पाणी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी ते केले नाही. त्यामुळे भविष्यात पाइपलाईनची कोणती अडचण निर्माण झाल्यास नव्याने बांधकाम केलेल्या कोट्यावधीच्या योगा सेंटरची तोडफोड करणार का? असा सवाल शिवसेना नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला.
नगरसेवक श्री. सुर्याजी म्हणाले, नरेंद्र डोंगरावरील ५ लाख लीटरच्या टाकीवरून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होतो. इथे नैसर्गिक स्त्रोताच्या माध्यमातून देखील पाणी येते. झऱ्याच्या माध्यमातून येणारे पाणी ही सावंतवाडीकरांसाठी दैवी देणगी आहे. मात्र, मेडीटेशन‌ आणि योगा सेंटरचे काम करत असताना ही लाईन फुटली आहे. आज त्यावर मलमपट्टी केली असून नगरपरिषद बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाकडून यावर कार्यवाही होणे आवश्यक होते. जमीनीखालील असणारी ही पाईपलाईन शेजारील भागातून हलवणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नसून जुलै महिन्यात देखील लोकांना पाणी पुरवठा होत नाही. लोकांना एकवेळ पाणी मिळत नसून ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले लोक ग्रामीण भागच बरा असे म्हणत आहेत. नगरपरिषद अधिकाऱ्यांकडून यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे भविष्यात योगा सेंटरच्या इमारत बांधकामानंतर पाईपलाईन लिकेज झाल्यास नव्याने बांधल्या जाणाऱ्या इमारतीची तोडफोड करणार का ? असा सवाल नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला. तर दोन दिवसांत यावर कार्यवाही झाली नाही, शहराला दोन वेळ पाणी पुरवठा पुर्ववत केला नाही तर सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये अनोख्या स्वरुपात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा कडक इशाराही दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे