न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी येथील भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शुभ्रा देसाईचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडी येथील भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शुभ्रा देसाईचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शुभ्रा संजीव देसाई हिने ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित १४ वर्षांखालील जिल्हास्तरीय ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शुभ्राने विभागीय स्तरावरील ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. तिच्या या यशामुळे यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शुभ्राच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे