न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा ३० एप्रिलला पुरस्कार वितरण सोहळा

​सिंधुदुर्ग /राजू तावडे

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा वार्षिक ‘पुरस्कार वितरण सोहळा’ गुरुवार दिनांक ३० एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिती सावंतवाडी येथील शिल्पग्राम सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
​या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उप सभापती गौरव मुळीक, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
​या कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल विविध मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे. यात पत्रकार ​श्री. रुपेश हिराप यांना वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार,
​श्री. भगवान शेलटे यांना कै. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार, ​सौ. मंगल नाईक-जोशी यांना माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार, जेष्ठ पत्रकार ​श्री. अभय पंडीत यांना कै. पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार तर ​श्री. संतोष परब यांना स्व. त्रिं. अ. उर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार व कणकवली येथील छायाचित्रकार ​श्री. हेमंत काळसेकर यांना ज्येष्ठ पत्रकार तथा छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ​या मुख्य पुरस्कारांसोबतच विशेष प्राविण्यप्राप्त पत्रकार आणि पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात येणार आहे.
​ तरी या ​कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गांवस आणि कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे