न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

घरातील स्लॅप कोसळल्यानं आजी आणि नातवाचा दुर्दैवी अंत

नाशिक/ वृत्तसंस्था

जिल्ह्यातील मालेगाव शहरात धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे घरातील स्लॅप कोसळल्यानं आजी आणि नातवाचा दुर्दैवी अंत झाला आहे. मालेगाव शहर व परिसरात पावसाची संततधारसुरु आहे. या पावसामुळं घराचा स्लॅब कोसळल्याने आजी विमलबाई पंढरीनाथ येवले ( वय वर्ष 80 ) व नातू चेतन रामचंद्र येवले ( वय वर्ष 20 ) यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. येवले कुटुंबीयांत एकूण 5 जण कुटुंबात राहत होते. घटनेनंतर घटनास्थळी अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी, परिसरातील नागरिकांनी रेस्क्यू करुन घरातील इतर सदस्यांना बाहेर काढलं आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे