लघु पाटबंधारे विभागाच्या कामांसंदर्भात श्वेत पत्रिका काढा – आमदार निलेश राणे
सिंधुदुर्गनगरी/ देवयानी वरसकर
लघु पाटबंधारेविभागची श्वेत पत्रिका काढण्यापासुन वीज महामंडळ, वन विभाग, समाज कल्याणच्या कामाकाजाबद्दल प्रखर मते मांडून आमदार निलेश राणे यांनी आज जिल्हा नियोजन समिती सभा गाजवली.पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांना यावर स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना दिली.
जिल्हा नियोजन समितीची सभा आज येथील नीती सभागृहात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद जगताप,आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, उप वन संरक्षक मिलिश शर्मा, नियोजन अधिकारी यशवंत बुधवले आदी उपस्थित होते.
वीज विभागाच्या कामाकाजासाठी साडे तीनशे कोटी रुपये जिल्ह्यात आले मग ते प्रत्यक्षात कामाकाजात दिसत का नाहीत असा प्रश्न आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला.आपल्या मतदार संघात तब्बल 50 तास लाईट नव्हती. याची कारणे काय असाही प्रश्न उपस्थित केला. यावर मुख्य अभियंता अभिमन्यू राख यांनी आपण एप्रिलपासून कामाना सुरुवात केली असे सांगितले. यावर पुढ्यच्या वर्षी जानेवारी पासूनच कामं सुरु करा. येथील पावसाचे प्रमाण पाहता जादा कुमक, जादा पोल मागवा अशी सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.
लघु पाटबंधारे विभाग कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधन्यासाठी निधी मागणी करतो. याची कामं किती झाली, किती निधी दिला यावर समर्पक उत्तरं न मिळाल्याने आमदार निलेश राणे यांनी यावर श्वेत पत्रिका काढावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितले.
वन विभाग दरवर्षी निधीची मागणी करतो मात्र त्याचा उपयोग काय झाला याची सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली. गवे रेडे, माकडं, हत्ती यांच्या त्रासामुळे लोकांनी शेती करणं सोडून दिलंय. अनेकदा गवे, हत्ती कडून झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे जीवही गेले आहेत. मग त्यावर उपाययोजना काय काय झाली असेही त्यांनी विचारले.
सभेच्या सुरुवातीला सिंधू रत्न योजनेला मुदतवाढ दिली म्हणून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज योजना, काजू आंबा नुकसान भरपाई, सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्याना ओसरगाव टोल नाक्यावर टोल माफी, दशावतार कलावंताना राजश्रय मिळाल्या प्रकरणी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांनी आता खर्चावर लक्ष दिलं पाहीजे. जो निधी विकास कामाना दिला जातो तो खर्च झाला पाहीजे अशा पालकमंत्री नितेश राणे यांची सूचना
समाजकल्याण विभागाच्या निधी वरून खासदार नारायण राणे यांनी तुमच्या सारखे अधिकारी असते तर आतापर्यन्त आम्ही काहीच करू शकलो नसतो असे उदगार काढले.
प्राथमिक शाळाच्या छपरांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी सगळ्या शाळाच्या छापरांची पाहणी करावी आवश्यक तिथे टेकू लावावेत -आमदार दीपक केसरकर यांची सूचना
सावंतवाडी जेलचा उपयोग जेल टुरिझमसाठी करता येईल का यासाठी आढावा घ्यावा – आमदार दीपक केसरकर यांची मागणी


