न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन तर्फे सौ. शितल सावंत यांचा विशेष पुरस्काराने सन्मान

सिंधुदुर्ग / राजू तावडे

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील “महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन ” या राज्यस्तरीय सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या “नवदुर्गा सन्मान सोहोळा “कार्यक्रमामध्ये कणकवली येथील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या सौ. शितल संजयकुमार सावंत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सौ. साधनाताई पाटील यांच्या शुभहस्ते सौ. सावंत यांनि विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा मा. मनीषाताई लोहार, प्रमुख पाहुण्या सौ.मृणालिनी मोहिते, संमेलनाध्यक्षा सौ. स्नेहा फणसाळकर, मा.सुजाता पेंडसे, सौ. अंजली नांगरे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. सौ. शितल सावंत या गेली 20 वर्षे कणकवली येथील महिलांना विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर होऊन काम करतात. तसेच बचतगट आणि विविध बचत गटांच्या समूहाना एकत्रित करून त्यांच्या व्यवसायास प्रोत्साहन देणे, मार्केट मिळवून देणे, महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, शासन अंगीकृत सेवांचा लाभ तळागाळातील गरीब व होतकरू महिलांना मिळवून देणे अशाप्रकारे सातत्याने कार्य करीत असतात. त्यांच्या या निस्वार्थी आणि प्रामाणिक पणे केलेल्या कार्याची दखल राज्यस्तरीय “महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन ” संस्थेने घेऊन पुरस्कारासाठी कोकणातील एकमेव सौ. शीतल सावंत यांची निवड करण्यात आली. हा नवदुर्गा सन्मान सोहोळा कोल्हापूर येथील मा. राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे