न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गुरुनाथ पेडणेकर यांचा सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या वतीने सत्कार

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सदस्यपदी गुरुनाथ पेडणेकर यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने आज मंगळवारी त्यांचा सत्कार करण्यात आला.

गुरुनाथ पेडणेकर हे खरेदी विक्री संघाचे तज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहेत. संघाचे संचालक तथा सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, उपाध्यक्ष राजन रेडकर, संचालक ज्ञानेश परब, शशिकांत गावडे, आत्माराम गावडे, प्रवीण देसाई, अभिमन्यू लोंढे, विनायक राऊळ, विष्णू गावडे, सगुण जाधव तसेच व्यवस्थापक महेश परब आदी उपस्थित होते.

3/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे