न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जळगावात कार दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

जळगाव/ वृत्तसंस्था

जळगावमधील इच्छादेवी चौकात कार- दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. लीलाधर मंगल पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या 36 वर्षीय दुचाकीस्वाराचे नाव असून कंपनीत कामावर जाताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कार मधील चार जण देखील गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर कार दुभाजकाला धडकून दोन वेळा रस्त्यावर उलटली. या अपघात प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यासह पुढील कारवाई सुरू आहे..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे