न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याची BCCI कडून घोषणा, T20, वनडे, टेस्ट, तारीख, मॅच टाइमसह जाणून घ्या सर्व शेड्युल

मुंबई/

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयने ऑक्टोंबर-नोव्हेंबर 2026 मध्ये होणाऱ्या टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक शेड्यूल जारी केलं आहे. या दौऱ्यात भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकूण 12 सामने होतील. यात 5 टी20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने आहेत. टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात 22 ऑक्टोंबर 2026 ख्राइस्टचर्च पासून होईल. टीम इंडिया इथे पहिला टी20 सामना खेळेल. टी 20 सीरीजचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होतील. त्यानंतर दोन्ही टीम्समध्ये पाच वनडे सामन्यांची सीरीज होईल. पहिला वनडे सामना 4 नोव्हेंबरला ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये होईल.

एकदिवसीय सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता सुरु होतील. ऑकलंड, वेलिंग्टन, हॅमिल्टन आणि माउंट माउंगानुई येथे हे सामने होतील. हा ऐतिहासिक दौरा ऑक्टोंबर 2026 मध्ये सुरु होईल अशी माहिती बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मिडिया पोस्टमधून दिली आहे. पाच टी20,पाच वनडे आणि दोन टेस्ट मॅच आहेत. टेस्ट सीरीजचे सामने 19 आणि 27 नोव्हेंबरपासून सुरु होतील.

भारत विरुद्ध न्यूजीलंड 2026 : टी20 सीरीज शेड्यूल, सर्व सामने दुपारी 1:30 वाजता

पहिली टी 20 – 22 ऑक्टोंबर ख्राइस्टचर्च (हेगले ओवल)

दुसरी टी 20 – 24 ऑक्टोंबर ख्राइस्टचर्च (हेगले ओवल)

तिसरी टी 20 – 27 ऑक्टोंबर वेलिंगटन (एचएनआरवाई स्टेडियम)

चौथी टी 20 – 30 ऑक्टोंबर ऑकलंड (ईडन पार्क)

पाचवी टी 20 – 1 नोव्हेंबर हॅमिल्टन (सेडन पार्क)

भारत विरुद्ध न्यूजीलंड 2026 : वनडे सीरीज शेड्यूल, सर्व सामने सकाळी 8.30 वाजता

पहिली वनडे – 4 नोव्हेंबर ऑकलंड (ईडन पार्क)

दुसरी वनडे – 7 नोव्हेंबर वेलिंगटन (एचएनआरवाई स्टेडियम)

तिसरी वनडे – 10 नोव्हेंबर ह२मिल्टन (सेडन पार्क)

चौथी वनडे – 13 नोव्हेंबर माउंट माउंगानुई (बे ओवल)

पाचवाी वनडे – 15 नोव्हेंबर माउंट माउंगानुई (बे ओवल)

भारत विरुद्ध न्यूजीलंड 2026 : टेस्ट सीरीज शेड्यूल, सर्व सामने सकाळी 4.30 वाजता

पहिला कसोटी सामना : 19 ते 23 नोव्हेंबर वेल‍िंगटन (बेस‍िन र‍िजर्व)

दुसरा कसोटी सामना : 27 ते 1 डिसेंबर ख्राइस्टचर्च (हेगले ओवल)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे