तब्येत स्वातंत्र्यदिनी झोया मरीन शिपयार्ड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य जहाजबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करणाऱ्या झोया मरीन शिपयार्ड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य जहाजबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन तळवणे येथे शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.
सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार असून, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. कोकणातील औद्योगिक प्रगतीला बळ देण्याच्या उद्देशाने तळवणे येथे जहाजबांधणी क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात होत आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खेवुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक तसेच तळवणे ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद केरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


