उत्तराखंडात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात पाणीसह माती शिरल्याने ४ कामगार अडकले
चमोली / वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मायापूर (पिंपळकोटी) येथे THDC द्वारे बांधल्या जाणाऱ्या एका बोगद्यात मोठी दुर्घटना घडलीय. मातीचा ढिगारा आणि पाणी शिरल्याने बोगद्यात सुमारे २० कामगार आत अडकले. ही घटना सायंकाळी ७:०५ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आलीय. रात्री ८:३० वाजेपर्यंत १६ कामगारांची सुरक्षित सुटका करण्यात आली होती, तर उर्वरित व्यक्तींचा शोध घेण्याचे आणि त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बोगदा बांधण्याचे काम HCC कंपनीकडून केले जात आहे”
जखमींना उपचारासाठी गोपेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय. आत अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ (SDRF), एनडीआरएफ (NDRF), आयटीबीपी (ITBP), लष्कर आणि इतर संबंधित यंत्रणांची पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी गौरव कुमार यांनी घटनास्थळी स्वतः उपस्थित आहेत. मदत व बचाव कार्यावर ते लक्ष ठेवून आहेत. बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवली जात आहे”
“मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सुद्धा या घटनेने दु:खी झालेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आली माहिती दिलीय. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये धामी यांनी सांगितले की, “पिपालकोटी येथील टीएचडीसी (THDC) बोगद्यात मलबा आणि पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे”


