न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

इन्सुरीत खून करून मृतदेह तिलारी कालव्यात टाकला

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

इन्सुली-डोबाशेळ येथील तिलारी कालव्यात एका अनोळखी वृद्ध पुरुषाचा मृतदेह गोधडीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कालव्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. मृतदेहाजवळ गोधडी आढळल्याने या घटनेबाबत संशय अधिक गडद झाला आहे.

कालव्याच्या पाण्यात मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतदेहाजवळ गोधडी आढळून आली असून, हा मृतदेह रात्रीच्या वेळी कालव्यात आणून टाकण्यात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे