न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नाभिक संघटनेतर्फे संजू परब यांचा सत्कार; रक्तदान शिबिराचे संपन्न

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

    सावंतवाडी तालुका नाभिक संघटनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संजू परब यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.यावेळी संजू परब यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नाभिक संघटनेच्या आपण कायम सदैव पाठीशी राहणार असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमास नाभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, ओबीसी मोर्चा तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर,युवासेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडीस, उपतालुका प्रमुख राकेश पवार, राजू मुळीक संदीप तळवणेकर आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे